मुंबई- सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करीत असलेले सीबीआयचे एक पथक दिल्लीतील एम्स बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित फॉरेन्सिक अहवालावर हे पथक चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुशांत प्रकरण : सीबीआयचे पथक दिल्लीत एम्सच्या डॉक्टरांना भेटणार
सीबीआयचे पथक गेल्या 22 दिवसांहुन अधिक काळ सुशांतच्या मृत्यूसंदर्भात तपास करीत आहे. या यादरम्यान सुशांतचा मृत्यू हत्या होती? अपघात होता? का आत्महत्या होती याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. यासाठी सायकॉलॉजिकल आटोप्सीचीही मदत घेण्यात येत आहे.
सीबीआयचे पथक गेल्या 22 दिवसांहुन अधिक काळ सुशांतच्या मृत्यूसंदर्भात तपास करीत आहे. या यादरम्यान सुशांतचा मृत्यू हत्या होती? अपघात होता? का आत्महत्या होती याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. यासाठी सायकॉलॉजिकल आटोप्सीचीही मदत घेण्यात येत आहे. सुशांतचा पीएम रिपोर्ट आणि व्हिसेरा, फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल सीबीआयला प्राप्त झाला आहे. यात सीबीआयच्या पथकाला सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत एका निष्कर्षावर येण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांसोबत चर्चा करायची आहे. एम्सच्या पथकाला सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट पाठविण्यात आला आहे. यावर एम्सचा अभिप्राय हा सीबीआय साठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, सीबीआयकडून आतापर्यंत शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी, दिपेश सावंत, नीरज सिंह, केशव, रजत मेवानी, जया शहा, चार्टर्ड अकाऊंटंट संदीप श्रीधर, श्रुती मोदी, यांच्यासह इतर व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतच्या बांद्रास्थित घरी सीबीआयने बऱ्याच वेळा जाऊन घडलेल्या घटनेचे रिक्रिएअशन केले आहे. लवकरच या संदर्भातील तपासाचा अहवाल सीबीआयकडून पूर्ण केला जाणार असल्याने सीबीआयच्या पथकाची दिल्लीतील ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. तर दुसरीकडे ईडीकडून आतापर्यंत 16हुन अधिक जणांना ड्रग्स पेडलिंग संदर्भात अटक करण्यात आली आहे. यात रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.