मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर ( Anil Deshmukh bail application ) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये ( Hearing on Anil Deshmukh bail application ) सुनावणी झाली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी युक्तिवाद केला. यादरम्यान अनिल देशमुख यांना जामीन देण्यात आला तर, प्रभावीशाली व्यक्ती महत्त्व असल्याने पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. असे त्यांनी न्यायालयात सांगितले. सीबीआयच्या ( CBI ) वतीने अनिल सिंग यांनी कोर्टात म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या सीबीआय कोर्ट ( CBI court decision to grant bail ) निर्णय देणार असल्याने अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहात की घरी साजरी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद - अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आज युक्तीवादा दरम्यान या प्रकरणातील दोन साक्षीदारांचा जबाब न्यायालयासमोर वाचून दाखवला. त्यामध्ये सचिन वाझे, पोलीस अधिकारी संजय पाटील त्यांचा जबाबदाचा संदर्भ देण्यात आला होता. सचिन वाझे यांचा जबाब या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा असल्याचा अनिल सिंग यांनी म्हटले आहे. रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून वसुली गेल्यानंतर अनिल देशमुख यांना देण्यात आले असा सचिन वाझे यांनी जबाब म्हटले आहे.
जामीन मंजूर करण्याची मागणी - अनिल सिंग यांनी सचिन वझे, संजय पाटील यांचा दिलेल्या जबाबदाचा संदर्भ देत अनिल देशमुख यांच्या वतीने अनिकेत निकम यांनी या दोन्हीही जवाबदाचा मुंबई उच्च न्यायालय ( Bombay High Court ) सर्वोच्च न्यायालयाने देखील दखल घेतली नाही. तसेच सचिन वाझे यांचा जबाब अविश्वासहाऱ्य असल्याचे टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवली होती. त्यामुळे सीबीआय आणि ईडी प्रकरणात सर्वच गोष्टी सारख्या आहे त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आहे.