मुंंबई- महाराष्ट्र सायबर विभागाकडून कोरोना काळात रेमेडेसिवीर आणि टोसिलीझूमॅब औषधांचे अधिकृत ऑनलाइन वितरक आहोत, अशी थाप मारुन नागरिकांची गंडवणाऱ्या टोळी विरोधात एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कंपनीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने कंपनीमध्ये उत्पादित होणाऱ्या रेमडेसिवीर व टोसिलीझूमॅब औषधांचे अधिकृत वितरक आहोत, अशी थाप मारून याबाबत समाज माध्यमावर प्रचार केला. त्यानंतर अनेकांनी त्या खोट्या वितरकाला संपर्क साधल्यानंतर जेवढ्या किंमतीचे औषधे आहेत त्याच्या पन्नास टक्के आगाऊ रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानंतर पीडितांनी वितरकाने दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम भरली. त्यानंतर पैसे भरलेल्यांनी औषधे कधी पोहोचतील याबाबत चौकशी केली असता, दोन दिवसांत पोहोचलतील, कंपनीतून औषधे निघाली आहेत, काही वेळातच औषधे पोहोचतील, अशी कारणे देऊ लागली. पण, औषधे मिळाले नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दुसरीकडे समाज माध्यमांवरही काही नागरिक हॅशटॅग वापरून फसवणूक झाल्याचे कंपनीला सांगत आहेत. यावरुन कंपनीने तक्रार दिली आहे.