मुंबईJumbo Covid Scam:आदित्य ठाकरे यांचा मित्र राहुल गोम्स, ओक्स कन्सल्टन्सी यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेनं भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२०ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे, (Rahul Gomes) अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. मुलुंड आणि दहिसर येथील जंबो कोविड सेंटर बांधण्याचा खर्च 28 कोटी इतका आला आणि मुंबई महापालिकेने १४० कोटींचे पेमेंट केला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड आणि दहिसरमध्ये जंबो कोविड सेंटर्स उभारण्याच्या कंत्राटात कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर नोंदवला. ताडदेव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका कंत्राटदार राहुल गोम्सविरुद्ध गुन्हा दाखल केला.
37 कोटींची फसवणूक:बुधवारी उशिरा रात्री आर्थिक गुन्हे शाखेने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे महापालिका कंत्राटदार राहुल गोम्स, त्याचे वेंडर्स आणि तत्कालीन अज्ञात अधिकार्यांवर 37 कोटींच्या फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला आहे. राहुल गोम्स यांनी हा घोटाळा ऑक्टोबर 2020 ते ऑगस्ट 2022 दरम्यान केला असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा ठेंगे यांनी स्वत: फिर्याद दिली आहे.