महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार : अजित पवार, जयंत पाटलांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल - सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (सोमवारी) राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Aug 26, 2019, 7:17 PM IST

Updated : Aug 26, 2019, 8:11 PM IST

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (सोमवारी) राज्य सहकारी बँकेच्या तब्बल २५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील अनेक मोठ्या 16 जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

FIR copy

एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 22 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात 5 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कलम 420, 506, 409, 465 व 467 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR copy

काय आहे प्रकरण -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे राज्यातील काही साखर कारखाने व सूत गिरण्यांना कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र, ही कर्जे पुन्हा वसूल न झाल्याने बँकेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता. हे कर्ज वाटप करण्याच्या काळात बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार, हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता. तर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ज्या सूत गिरण्या व साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आली त्यांचा संबंध हा राष्ट्रवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार : अजित पवार, जयंत पाटलांसह अन्य बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँका कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणी यांच्यावर होणार गुन्हे दाखल -

अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर, मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनीताई पाटील, माणिकराव कोकाटे

गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या नेत्यांची यादी
Last Updated : Aug 26, 2019, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details