महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : लोकसभा खासदार राहूल गांधी यांच्याविरोधात ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( Case filed against Rahul Gandhi ) आहे. आपीसी कलम 500, 501 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. क्रांतीकारक स्वातंत्र्य वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर ( objectionable statement on Savarkaranwar ) ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Rahul Gandhi
राहूल गांधी

By

Published : Nov 18, 2022, 9:08 AM IST

Updated : Nov 18, 2022, 9:37 AM IST

मुंबई : लोकसभा खासदार राहूल गांधी यांच्याविरोधात ठाणे जिल्ह्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( Case filed against Rahul Gandhi ) आहे. आपीसी कलम 500, 501 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर ( Objectionable Statement On Savarkaranwar ) ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सावरकरांचे पत्रच दाखवले :राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम असून सावरकरांचे पत्रच दाखवले. तसेच, हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच, असे आव्हानही भाजपाला दिले आहे. सर, मला तुमचा नोकर रहायचे आहे. हे मी म्हटले नाही. तर सावरकर यांनी म्हटले आहे. फडणवीसांना वाचायचे असेल तर त्यांनी हे पत्रं वाचावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असे पुन्हा एकदा म्हंटले आहे.

फोकस भारत जोडो यात्रेवर :माझा फोकस भारत जोडो यात्रेवर आहे. या यात्रेला अजून दोन तीन महिने लागणार आहेत. लोकांचे प्रेम मिळत आहे. लोकांकडून शिकायला मिळत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आमचे काम भारत जोडायचा आहे. हे आम्हाला करायचे आहे. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाही. आमची यात्रा रोखायची असेल तर रोखा. काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटले ही यात्रा रोखली पाहिजे तर त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

ठाण्यात आंदोलन :स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य Insulting statement on freedom fighter Savarkar केले. परिणामी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन Shinde group agitation केले. राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न देखील आंदोलनकर्त्यांकडून केला Attempt to burn Rahul Gandhi effigy गेला. वीर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी तारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. परंतू सावरकरांबद्दल काँग्रेसच्या मनात जी खदखद आहे ती त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून वारंवार दिसून येते. असे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के,आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक यांच्यासह माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Last Updated : Nov 18, 2022, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details