महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या ५ शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल

दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. यावर हिरामण तिवारी या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकून आक्षेप घेतला होता. याचा राग मनात धरून शिवसैनिकांनी रविवारी हिरामणला मारहाण केली होती. त्याप्रकरणी आता शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

cm Uddhav Thackeray
शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

By

Published : Dec 25, 2019, 12:14 PM IST

Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी तरुणाला मारहाण करून मुंडन केले होते. याप्रकरणी आता पाच शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे वाचलं का? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणांचे शिवसैनिकांकडून मुंडन

दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. यावर हिरामण तिवारी या युवकाने फेसबुकवर पोस्ट टाकून आक्षेप घेतला होता. याचा राग मनात धरून शिवसैनिकांनी रविवारी हिरामणला मारहाण केली. तसेच त्याचे मुंडनही केले होते.

Last Updated : Dec 25, 2019, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details