महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kamal Mishra Hit Wife: पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न! चित्रपट निर्माता कमल मिश्रावर गुन्हा दाखल - Kamal Mishra Hit His Wife

प्रसिद्ध चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीला कारने धडक ( Kamal Mishra Hit Wife ) दिली. यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागला. भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Kamal Mishra Hit Wife
कमल मिश्रा

By

Published : Oct 27, 2022, 10:33 AM IST

मुंबई :प्रसिद्ध चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ( Kamal Mishra Attempt to kill wife ) आहे. पत्नीला कारने धडक दिली, यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार ( Kamal Mishra Hit Wife ) लागला. भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कमल मिश्रावर गुन्हा दाखल : मिश्रा यांच्या बायकोने अन्य महिलेला गाडीत मिश्रासोबत पाहिल्याने संतापाने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले ( Kamal Mishra Caught with another woman ) आहे. कमल किशोर मिश्रा यांनी 2019 मध्ये चित्रपट निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. सोशल मीडियावर देखील ते प्रचंड सक्रिय असून, त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 19 चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्या कारमध्ये एक महिला होती. दोघांना गाडीत एकत्र पाहून कमल यांच्या पत्नीने कारची काच ठोठावली. मात्र, कमल यांनी पत्नीकडे दुर्लक्ष करत गाडी पुढे पळवण्याचा प्रयत्न केला. पत्नीने गाडी थांबण्याचा प्रयत्न केला असता, मिश्रा यांनी कारने पत्नीला धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून गंभीर दुखापत झाली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद : सीसीटीव्ही फुटेजमध्येही घटना कैद झाली ( incident captured in CCTV footage ) आहे. कमल मिश्रा यांच्या पत्नीने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल ( case has been registered against Kamal Mishra ) केली. पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कमल मिश्रा यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details