मुंबई - मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीशी निगडित टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्या प्रकारणी टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या ४ सहकाऱ्यांवर लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल - mumbai
मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तरबेझ अन्सारीशी निगडित टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्या प्रकारणी टिकटॉक स्टार फैझल शेख आणि त्याच्या ४ सहकाऱ्यांवर लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फैझल शेख व त्याचे सहकारी
भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंखी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फैझल शेख, हसणेन खान, फैज बलोच, अदनान शेख व साधनान फारुखी या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तबरेझ अन्सारीची हत्या केली. पण, त्याच्या मुलाने या हत्येचा बदला घेतला तर मुसलमान आतंकवादी आहे, असं म्हणू नका. अशा आशयाचा व्हिडिओ या ग्रुपकडून बनवण्यात आला होता.
दरम्यान, टिक टॉकवरून हा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्यात आला असल्याचे टिकटॉक कडून स्पष्ट करण्यात आले आहे.