मुंबई:लोअर परळ येथील एम/एस किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत २० पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधीत किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनीसह तीन संचालकांविरोधात एन. एन जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम वेळेत जमा न करता रकमेचा अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Kishori Pednekar: पीएफची रक्कम भरली नाही... किशोरी पेडणेकर यांच्या किश कंपनीविरोधात गुन्हा दाखल - कंपनीला कारणे दाखवा नोटीस
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल: भविष्य निधी संघटन अंमलबजावणी अधिकारी विद्या बाबर (45) यांच्या फिर्यादीवरून पोलीसांनी किश कंपनीचे संचालक प्रशांत गवस, शैला गवस आणि गिरशी रेवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोअर परळमधील गोमाता सोसायटीमध्ये कार्यालय असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेस्ट बस चालक पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यानुसार कंपनीने नियुक्त केलेल्या कर्माचाऱ्यांच्या वेतानातून पीएफची रक्कम कपात केली. मात्र, ती वेळेत कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केली नाही.
कंपनीला कारणे दाखवा नोटीस: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 21 जानेवारीला वांद्रे येथील कार्यालयात याप्रकरणात कारवाई करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यानुसार करण्यात आलेल्या चौकशीत, सदर कंपनीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2021 मधील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या जमा केली नसल्याचे दिसून आले. यात एकूण 4 लाख 47 हजार 843 रुपयांचा अपहार करण्यात आला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतानातून कपात केलेली पीएफची रक्कम आणि चार्जेस 2 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केले. कंपनीने वेळेत ही रक्कम जमा न केल्याने त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या काळात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:Maratha Reservation News आगामी निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाच्या नावाखाली दोन जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न माधव कांबळे