मुंबई - विक्रोळी परिसरातील सुर्या नगरच्या विट्रम ग्लास गल्लीत कार्बन डायऑक्साईड गॅस सिलेंडरचा स्फोटामध्ये गंभीर जखमी होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. युवकाला उपचारासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत युवकाचे नाव पन्नालाल यादव आहे
विक्रोळीत कार्बन डाय ऑक्साईड गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू - अग्निशमन दल
बॉम्बे गॅस सप्लाय सर्व्हिसेस ही नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड पुरवणारी कंपनी आहे. सकळी एका ट्रक मध्ये भरलेले सिलेंडर भरत असताना एक कार्बनडाय ऑक्साईड सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
बॉम्बे गॅस सप्लाय सर्व्हिसेस ही नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड पुरवणारी कंपनी आहे. सकळी एका ट्रक मध्ये भरलेले सिलेंडर भरत असताना एक कार्बनडाय ऑक्साईड सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे हा परिसर हादरला. परिसरातील काही लोक घरा बाहेर आले. तर समोर त्यांना स्फोट झाल्याचे विदारक दृश्यात पन्नालाल यादव हा युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
हा स्फोट इतका भयंकर होता की त्या युवकाचे हात पाय व इतर अवयवही तुटून उडाले होते. या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर ते घटना स्थळी पोहचले. पार्क साईट पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहे.