मुंबई- भांडुपच्या लालबहादुर शास्त्री मार्गावर चालत्या कारने पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. ही घटना आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असून चालकाच्या दक्षपणामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भांडुपमध्ये बर्निग कारचा थरार; जीवितहानी नाही - लालबहादूर शास्त्री मार्ग
स्विफ्ट डीजायर(MH ०३ ७११७) ही कार लालबहादूर शास्त्रीमार्गावरील महानगरपालिकेच्या एस विभागासमोरून काजूरमार्गच्या दिशेने जात होती. दरम्यान, कारच्या इंजिनमध्ये अचानक स्पार्क होऊन कारने पेट घेतला. चालकाच्या दक्षपणामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
![भांडुपमध्ये बर्निग कारचा थरार; जीवितहानी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3570786-thumbnail-3x2-car.jpg)
स्विफ्ट डीजायर(MH ०३ ७११७) ही कार लालबहादूर शास्त्रीमार्गावरील महानगरपालिकेच्या एस विभागासमोरून काजूरमार्गच्या दिशेने जात होती. दरम्यान, कारच्या इंजिनमध्ये अचानक स्पार्क होऊन कारने पेट घेतला. स्विफ्ट चालक प्रतीक काळे याला बोनेटमधून धूर आणि ज्वाला निघत असल्याचे दिसताच त्याने तत्काळ कारचा वेग कमी केला. त्यानंतर प्रतिकने आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन मित्रांनी चालत्या गाडीतून उडी मारली. परंतु काही सेकंदातच या गाडीने पेट घेतला आणि ही गाडी जळत जळतच काही अंतर पुढे गेली.
काही स्थानिक नागरिकांनी ही जळती कार थांबवली आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.अग्निशमन दल आणि भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही आग विझवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत ही गाडी जळून खाक झाली.