महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धावत्या कारने घेतला पेट, जीवितहानी नाही - कारला आग

जेठालाल प्रधान मंगे हे त्यांच्या इनोव्हा (एमएच ४३ एडब्ल्यू-४९०१) गाडीतून घणसोलीतील आपल्या घरी परतत होते. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बोनकोडे सेक्टर १२ वर येताच अचानक गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. हे लक्षात येताच तत्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला लावून मंगे बाहेर पडले. अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कारने पेट घेतला आणि कार भस्मसात झाली.

car fire
धावत्या कारने घेतला पेट

By

Published : Jan 25, 2020, 8:09 PM IST

Updated : Jan 25, 2020, 8:31 PM IST

नवी मुंबई - कोपरखैरणे येथे रस्त्यावर एका धावत्या इनोव्हा कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या घटनेत गाडीतील साहित्य जळून खाक झाले आहे.

धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना ; 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

जेठालाल प्रधान मंगे हे त्यांच्या इनोव्हा (एमएच ४३ एडब्ल्यू -४९०१) गाडीतून घणसोलीतील आपल्या घरी परतत होते. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील बोनकोडे सेक्टर १२ वर येताच अचानक गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. हे लक्षात येताच तत्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला लावून मंगे बाहेर पडले. अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कारने पेट घेतला आणि कार भस्मसात झाली.

हेही वाचा - एका गावाची प्रेरणादायी गोष्ट.. 'दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार'

कोपरखैरणे अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी आर. आर. कोकाटे, स्थानक अधिकारी व्ही. व्ही. म्हात्रे यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Last Updated : Jan 25, 2020, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details