महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॅप्टन दीपक साठे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Captain Deepak Sathe funeral

त्यांचे पार्थिव वांद्रेतील भाभा रूग्णालयात ठेवण्यात आला होता. ते पार्थिव चांदिवली येथील नाहर या निवासस्थानी आणण्यात येणार आल्या होते. यानंतर विक्रोळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Captain Deepak Sathe
कॅप्टन दीपक साठे

By

Published : Aug 11, 2020, 10:16 AM IST

Updated : Aug 11, 2020, 3:05 PM IST

मुंबई - केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर धावपट्टीवरुन विमान घसरून शुक्रवारी मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत मराठमोळे कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. साठे हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी विक्रोळीच्या हिंदू स्मशानभूमीतील घेतलेला आढावा.

त्यांचे पार्थिव वांद्रेतील भाभा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. ते पार्थिव चांदिवली येथील नाहर या निवासस्थानी आणण्यात आल्या होते.

  • कॅप्टन दीपक साठे अनंतात विलीन
  • कॅप्टन दीपक साठे यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव विक्रोळी येथील स्मशानभूमीच्या दिशेने निघाले आहे.
  • महापौर किशोरी पेडणेकर या कॅप्टन दीपक साठे यांच्या पवई येथील निवासस्थानी अंतिम दर्शन घेण्यासाठी दाखल
    केरळ विमान दुर्घटना : कॅप्टन दीपक साठे यांच्यावर आज शासकिय इतमामात होणार अंत्यसंस्कार
  • शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.

Last Updated : Aug 11, 2020, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details