मुंबई -आपल्या मनासारखे सरकार आणायचे असेल तर प्रत्येक भारतीयाने मतदान करायला हवे. मतदानाचा हक्क जबाबदारी म्हणून आम्ही आज सहकुटुंब मतदान केले. प्रत्येक नागरिकाने जबाबदारी म्हणून मतदान करावे, असे आवाहन कॅप्टन अमोल यादव यांनी केले.
कॅप्टन अमोल यादव यांची प्रतिक्रिया हेही वाचा - पुण्यात मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल, मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
अमोल यादव यांनी सहकुटुंब कांदिवलीत केले मतदान केले. त्यांनी मुंबईच्या एका उपनगरातील त्यांच्या घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान तयार केले आहे. त्याला परिपूर्ण स्वरूप देण्यासाठी त्यांनी १८ वर्षे खर्च केली आहेत. विमान उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांकडून त्यांना मंजुरी मिळाली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक Live : राज्यात आतापर्यंत 34.37 टक्के मतदान, गडचिरोलीत मतदान केंद्रावरील शिक्षकाचा मृत्यू