मुंबई- रिफायनरी आणि केमिकल कंपनीने वेढलेल्या 30 हजार लोकांच्या वस्तीत केमिकल प्रदूषणांमुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित होत आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांनी राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मेणबत्ती शोक यात्रा काढली.
रिफायनरी, केमिकल कंपनीविरोधात माहुल प्रकल्पग्रस्तांची मेणबत्ती शोक यात्रा - माहुल प्रकल्पग्रस्त
रिफायनरी आणि केमिकल कंपनीने वेढलेल्या 30 हजार लोकांच्या वस्तीत केमिकल प्रदूषणांमुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित होत आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांनी राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे
माहुल प्रकल्पग्रस्त वस्तीत प्रत्येक घरात आजाराने त्वचा रोगाने माणसं सडत आहेत. प्रदुषित पाणी पिण्याने कावीळ उलट्या जुलाब आणि प्रदूषित हवेमुळे घश्याचे आजार तर कोणाला क्षयरोग, किडनी आजाराने लोक दगावतात. असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शोक यात्रेच्या सुरवातीला सांगितले. आजाद मैदानात 7 दिवसात 3 लोकांचा मृत्यू आजाराने झाला होता. जीवन बचाव आंदोलनाला आज 100 दिवस झाले. या 100 दिवसात 22 लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या
माहुल मध्ये प्रकल्प ग्रस्त लोकांना राहण्या योग्य वातावरण नसतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त व मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करत आहेत. मृत लोकांना श्रद्धांजली अर्पण करून अहिंसक पणे महिला, लहान मुले यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध शोक यात्रा काढली. ही यात्रा आंदोलनाचे ठिकाण ते राजावाडी सिग्नल, विध्यविहार रेल्वे स्थानक पासून धरणा ठिकाणी येऊन हातातील मेणबत्ती मृत लोकांच्या तसबीर समोर नमन करून संपली.