महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दीड लाखांहून अधिक मते घेण्यात 'आघाडी'चे उमेदवारच आघाडीवर - maharashtra vidhan sabha election result 2019

या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून आले असून या निवडणुकीत ते सर्वाधिक मते मिळविणारे खऱ्या अर्थाने 'दादा' ठरले आहेत. त्यासोबत काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी १ लाख ६० हजारांहून अधिक मते मिळवली असून त्या खालोखाल राष्ट्रवादीचे सुशील शेळके, भाजपचे किसन कथोरे, प्रशांत ठाकूर, सुनील राणे आणि त्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ९० हजारांहून अधिक मते मिळविली आहेत.

आघाडीचे उमेदवारच 'आघाडीवर'

By

Published : Oct 25, 2019, 9:48 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा विक्रम यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते सर्वाधिक मते मिळविणारे खऱ्या अर्थाने 'दादा' ठरले आहेत. त्यासोबत काँग्रेसचे विश्वजित कदम यांनी १ लाख ६० हजारांहून अधिक मते मिळवली असून त्या खालोखाल राष्ट्रवादीचे सुशील शेळके, भाजपचे किसन कथोरे, प्रशांत ठाकूर, सुनील राणे आणि त्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ९० हजारांहून अधिक मते मिळविली आहेत.

हेही वाचा - अजित पवारांसह विश्वजीत कदमांचे मताधिक्य पाहून व्हाल थक्क...राज्यातील ५ विक्रमी विजयवीर

बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, यांना एकुण १ लाख ६५ हजार २६५ मते मिळाली. त्यांनी आपल्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांचे डिपॉझीट जप्त करून त्याचाही एक नवा विक्रम केला आहे. दुसरीकडे पलूस कडेगाव मतदारसंघात विश्वजीत कदम यांनी १ लाख ६२ हजार ५२१ मते घेतली. तर, मावळमधून राष्ट्रवादीचे सुशील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ९३ हजार ९४२ मतांनी पराभव केला. बदलापर येथून भाजपचे किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांचा पराभव करून तब्बल १ लाख ३६ हजार ४० मते घेतली. तर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकरमधून ९७ हजार ४४५ मताधिक्क्यांनी भाजपच्या श्रीनावास गोरठेकर यांचा पराभव केला. बोरीवलीत माजी मंत्री विनोद तावडे यांच्या ठिकाणी उमेदवारी मिळालेल्या सुनील राणे यांनी ९५ हजार २१ मते घेऊन काँग्रेसच्या कुमार खिल्लारे यांचा पराभव केला. प्रशांत ठाकूर - ९२ हजार ७३०, शेकापच्या हरिष केणी यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा - आघाडी हरली, पण पवार जिंकले.....

यानंतर ८० हजार आणि त्यातून अधिक मते‍ मिळवणाऱ्यांमध्ये ठाणे पाचपाखाडी येथून सेनेचे एकनाथ शिंदे यांचा ८९ हजार ३०० मते घेऊन काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा पराभव केला. शिर्डी येथून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ८७ हजार २४ मतांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा पराभव केला. वोहळा-माजीवाडा येथे सेनेच्या प्रताप सरनाईक यांनी काँग्रेसच्या विक्रांत सावंत यांचा ८४ हजार ८ मतांनी पराभव आहे. तर, ७० हजार आणि त्यादरम्यान मतांची आघाडी घेणाऱ्यांमध्ये भोसरी पुणे येथे भाजपच्या महेश लांडगे यांनी ७७ हजार ५६७ मते मिळवत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला. लांडे यांना मनसेसह महाआघाडीने पाठिंबा दिला होता. चारकोपमधून भाजपचे योगेश सागर यांनी काँग्रेसच्या काळू बुधलिया यांचा ७३ हजार ७४९ मते घेऊन पराभव केला.

हेही वाचा - 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांनी ऐरोली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांचा ७८ हजार ४९१ मतांनी पराभव केला. मलबार हिल मधून भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा ७१ हजार ८७२ मतांनी पराभव केला. नंदूरबारमधून भाजपचे विजयकुमार गावीत यांनी काँग्रेसच्या उदयसिंग पडवी यांचा ७० हजार ३९६ मतांनी पराभव केला. मुंब्रा - कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सेनेत ऐनवेळी आलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा ७५ हजार ६३९ मतांनी पराभव केला. तर, वरळीत सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेश माने यांचा ६७ हजार ४२७ मतांनी पराभव केला आहे.

हेही वाचा -यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...

ABOUT THE AUTHOR

...view details