मुंबई - महाराष्ट्र्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मात्र, शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस पडत असल्याने भरपावसात उमेदवारांनी रॅली, भेटीगाठी घेऊन मतदारांना आवाहन करावे लागले.
महाराष्ट्र्रातील विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी हजारो उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार फेऱ्या, सभा, चौक सभा, घरोघरी भेट आदी माध्यमातून प्रचार करतात. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार बंद केला जातो. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार बंद झाला. मात्र, मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने प्रचाराचा दिवस फुकट गेला असता. मात्र, पावसाची तमा न बाळगता उमेदवार आणि राजकीय पक्षांनी बाईक रॅली, पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन केले.