महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलुंड कोविड सेंटर : रिचर्डसन ट्रस्टला दिलेले कंत्राट रद्द करा, अन्यथा कोर्टात जाऊ - मिहीर कोटेचा - Mihir Kotecha oppose Richardson Trust mulund

कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे मुलुंड येथे जंबो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्रात वैद्यकीय व्यवस्थापनाचे कन्नाट रिचर्डसन आणि क्रुडास ट्रस्ट व रिसर्च सेंटरला देण्यात आले. मात्र, ट्रस्टने कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.

Mihir Kotecha oppose Richardson Trust
मिहीर कोटेचा

By

Published : Dec 3, 2020, 9:03 PM IST

मुंबई -कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे मुलुंड येथे जंबो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्रात वैद्यकीय व्यवस्थापनाचे कन्नाट रिचर्डसन आणि क्रुडास ट्रस्ट व रिसर्च सेंटरला देण्यात आले. मात्र, ट्रस्टने कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. ट्रस्टवर महापालिकेच्या यंत्रणेने देखील ठपका ठेवल्याचे सांगत, ट्रस्टचे कन्नाट रद्द करण्याची मागणी कोटेचा यांनी केली आहे. तसेच, ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवला दाखल करावा, अशी मागणीही कोटेचा यांनी पत्रकार परिषदेत केली.

माहिती देताना भाजप आमदार मिहीर कोटेचा

मुलुंड कोविड सेंटरमध्ये अनेक अडचणी

कोटेचा यांनी सांगितले की, रिचर्डसन आणि क्रुडास ट्रस्ट व रिसर्च सेंटर या संस्थेला मुलुंड येथील ६०० खाटांच्या कोविड उपचार केंद्राला आवश्यक तो कर्मचारी वर्ग पुरवण्याचे कंत्राट जुलैमध्ये देण्यात आले. यासाठी संस्थेला करारात काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, या अटीचे पालन या संस्थेकडून होत नसल्याचे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. उपचार केंद्रात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा ५० टक्के कमी आहे. या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना सेवा पुरवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे कोटेचा यांनी सांगितले.

नियुक्त केलेल्या परिचारिका पुरेशा प्रशिक्षित नाहीत - कोटेचा

कोटेचा पुढे म्हणाले की, या केंद्राबाबत आम्ही लोकप्रतिनिधींना तक्रारी देखील केल्या आहेत. तसेच, ट्रस्टने नियुक्त केलेल्या परिचारिका पुरेशा प्रशिक्षित नाहीत, असेही आमचा व पालिकेचा निदर्शनास आढळून आले आहे. त्याचबरोबर, रुग्णांना घरी केव्हा सोडायचे याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांकडून झालेले नाही. रुग्ण बरा झाला असूनही त्याला उपचारकेंद्रातच थांबवून ठेवले जाते. अशा तक्रारीच्या आधारे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी या केंद्राला नोटीसही पाठविली आहे. या उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. काही रुग्णांना आवश्यकता असूनही रेमडीसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले नाही, तर काहींना आवश्यकता नसताना हे इंजेक्शन देण्यात आले.

तसेच, काही रुग्णांना प्राणवायू पुरवठा करणे गरजेचे असूनही रुग्णांना वेळेत प्राणवायू पुरवठा होऊ न शकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काहींना गरज नसताना प्राणवायू दिल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही जणांना प्राणवायू पुरवठा केला जात असल्याचे कागदपत्रांतून दाखवले गेले. मात्र, प्रत्यक्षात प्राणवायू पुरवठा सुरूच नसल्याचे आढळून आले, असे कोटेचा म्हणाले.

48 तासात कारवाई करा अन्यथा.....

या केंद्रात झालेल्या मृत्यूंबद्दल ट्रस्टचे संचालक, कर्मचारी व या ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करावा. तसेच, ट्रस्टचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे. जर, 48 तासात कारवाई केली नाही, तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा कोटेचा यांनी दिला.

हेही वाचा -'आमच्याकडे चौथे चाक हे जनतेचे, आम्ही हा रथ पुढे नेत आहोत'

ABOUT THE AUTHOR

...view details