मुंबई - राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा चालू असून मुंबईतील एक दहावीची परीक्षा देत असलेली कर्करोगग्रस्त विद्यार्थिनी अचानक आजारी पडली होती. विद्यार्थिनीची परीक्षा देण्याची इच्छा असल्याने आज परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांनी या विद्यार्थीनीला तिची व्यवस्था परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात केली होती. पेपर दिल्यानंतर या विद्यार्थिनीने परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मुंबईच्या वांद्रे येथील माउंट मेरी शाळेची मालिक सगिरा जेद अली ही विद्यार्थीनी दहावीची परीक्षा देत असून. तिचे माहीम येथील कनोसा विद्यालय हे परीक्षा केंद्र आले आहे. या विद्यार्थीनी कर्करोग बाधित आहे. या आजारावर मात करत ती दहावीची परीक्षा देत आहे. शाळेच्या विनंतीनुसार मंडळाने तिला रायटर आणि परीक्षेसाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी या विद्यार्थीनीला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे तिची परीक्षा रुग्णालयात घेण्याबाबत कनोसा शाळेतील अधिकाऱ्यांनी मंडळाला सकाळी 10 वाजता विनंती केली. विद्यार्थिनीची परीक्षा देण्याची इच्छा आणि अधिकाऱ्यांचा पाठपुरावा पाहता, मंडळाने तातडीने या विद्यार्थिनीसाठी परीक्षक, पोलीस, रायटर आदी आवश्यक बाबी पुरविल्या.