महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वैद्यकीय परीक्षा रद्द करणे नियमानुसार योग्य नाही' - Medical Education Minister Amit Deshmukh

वैद्यकीय परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमानुसार योग्य ठरत नाही. सुरक्षित वातावरणात १० जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

By

Published : May 21, 2021, 7:10 PM IST

मुंबई - वैद्यकीय परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमानुसार योग्य ठरत नाही. सुरक्षित वातावरणात १० जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती आहे. मात्र, या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला धरून नाही. यासाठी न्यायालयानेही परवानगी दिलेली नाही. तरी, विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घ्यावी. तसेच, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी या काळात घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

'सुरक्षित वातावरणात परीक्षा घेतल्या जातील'

राज्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. २ जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून, त्या १० जूनपासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाल्यास, त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयाने केले आहे. हे सगळे नियोजन केलेले असतांना, या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काही विदयार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैद्यकीय महाविद्यालयाकतून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे योग्य ठरत नाही. केंद्रिय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्च न्यायालयानेही ही बाब नाकारलेली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. मागच्या वर्षातही कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने परीक्षा यशस्वी घेतली असून, त्या सुरक्षीत वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जून पासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपुर्णपणे कोरोना सुरक्षा कवच पुरवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्व काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा -अहमदाबादमधील 13 वर्षीय मुलाला ‘म्युकरमायकोसिस’ ची लागण

हेही वाचा -भय इथले संपले नाही! 'अम्फान'पेक्षाही भयंकर ‘यास’ चक्रीवादळ धडकणार; अलर्ट जारी

ABOUT THE AUTHOR

...view details