महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2020 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - संजय निरुपम - काँग्रेस न्यूज

काँग्रेस शिवसेनेसोबत भविष्यातील निवडणूका लढवणार का? सत्तास्थापनेवरून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच 2020 च्या मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा असेही निरुमप यांनी ट्विट करत म्हटले आहे.

संजय निरूपम

By

Published : Nov 11, 2019, 11:53 AM IST

मुंबई- काँग्रेस शिवसेनेसोबत भविष्यातील निवडणूका लढवणार का? सत्तास्थापनेवरून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच 2020 च्या मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा असेही निरुमप यांनी ट्विट करत म्हटले आहे. त्यामुळे या विधानामुळे निरुपम यांचा वेगळा सूर बघायला मिळत आहे.

हेही वाचा -सेनेच्या आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

सध्या राज्यातील राजकीय अस्थिरता कदाचीत पुढेही अशीच राहू शकते. त्यामुळे आपल्याला मध्यावधी निवडणुकांसाठीही सामोरे जावे लागेल. त्यासाठी तयार रहा, असे सांगून निरुपम यांनी पुन्हा 2020 मध्ये निवडणुका होऊ शकतात, असे सुतोवाच केले आहे.

हेही वाचा -काँग्रेसचे आमदार चार वाजता जयपूरहून मुंबईत होणार दाखल

सध्या भाजप-सेनेत मुख्यमंत्री पदावरुन बिनसल्याने सत्तास्थापनेसाठी सर्वच पक्षांकडून वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. भाजपला सबुरी शिकवण्यासाठी शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाताची मदत घेऊ शकते अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर, भविष्यातील निवडणुका काँग्रेस-शिवसेना एकत्र लढवणार का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसमध्येच एक वेगळा सूर सध्या पहायला मिळत आहे.

​​​​​​​​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details