महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: मसाजच्या नावावर हॉटेलमध्ये बोलावले अन् बंदुकीच्या धाकावर लुटले; वाचा धक्कादायक घटना - मसाज लुटमार प्रकरण

मुंबई पश्चिम उपनगर येथील सांताक्रुज पूर्वेकडील एका नागरिकास मसाजचे आमीष दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित व्यक्तीस बाबा होम्स या हॉटेलमध्ये नेऊन बंदुकीचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर केवळ दोन तासातच सात आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

Mumbai Crime
अटकेतील आरोपी

By

Published : Jul 8, 2023, 8:37 PM IST

मसाज लुटमार प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

मुंबई :या प्रकरणीनिलेश शिवकुमार सरोज (वय २४ वर्षे), विशाल राजेश सिंग (वय २० वर्षे), आदित्य उमाशंकर सरोज (वय १९ वर्षे), सुरेश रामकुमार सरोज (वय २१ वर्षे), कुलदीप शेशनाथ सिंग (वय २८ वर्षे), सुरेश रामसिंग विश्वकर्मा (वय ४६ वर्षे), अश्विनीकुमार शीट (वय ३८ वर्षे) अशी अटक सात आरोपींची नावे आहेत.


दोन तासात अटक :आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवून तक्रारदार यांच्या पाकिटातील रोख रक्कम दहा हजार आणि विविध बँक खात्यातून आपल्या साथीदारांच्या खात्यात जीपेद्वारे पैसे पाठवले. याप्रकरणी तक्रारदार यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अंधेरी परिसरातून अटक केली आहे. तक्रार दिल्यानंतर अवघ्या दोन तासातच वाकोला पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.

इतर 5 लोकांना फसवले :वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी एका व्यक्तीला फोन करून मसाज करण्याच्या बहाण्याने वाकोल्यातील एका हॉटेलमध्ये बोलावले. व्यक्ती हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याच्याकडून बंदुकीच्या धाकावर पैसे वसूल करण्यात आले. 10 हजार रुपये रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर जीपे अकाउंटद्वारे 85 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. पीडित व्यक्तीने घटनेची पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ दोन तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अधिक तपासात त्यांनी अशा प्रकारे पाच वेगवेगळ्या लोकांना फसवले असल्याचे परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित कुमार गेडाम यांनी सांगितले आहे.



आरोपींना तांत्रिक कौशल्याच्या आधारे अटक :तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी निलेश यास त्याच्या अन्य ३ साथीदारांसह अंधेरी पोलीस ठाणे परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. निलेश शिवकुमार सरोज, विशाल राजेश सिंग, आदित्य उमाशंकर सरोज, सुरेश रामकुमार सरोज या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांच्यासोबत आणखी 3 साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्याची माहिती प्राप्त करून त्यांनादेखील अटक करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हा मुद्देमाल केला जप्त :अटक आरोपीकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे रोख रक्कम 10 हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ९ मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

हेही वाचा:

  1. Mumbai Crime: चेष्टेत अनोळखी क्रमांकावरून मित्राला केला 'हा' व्हॉट्सअप मेसेज, पोलिसांनी थेट तुरुंगात केली रवानगी
  2. Nashik Crime News : भोंदूगिरीतून महिलेची निर्घृण हत्या...
  3. Mumbai Crime News: साखर निर्यातीच्या नावाखाली परदेशातील व्यवसायिकाला 17 कोटींचा गंडा; तिघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details