मुंबई Call About Bomb In Mumbai :मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या गणेशोत्सवासाठी अवघी मुंबई नगरी सजलीय. या आनंदाच्या क्षणावर एका कॉलनं अचानक भीतीचं सावट पसरलं.
पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा कॉल :झालं असं की, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा कॉल आला. यामध्ये कॉलरनं सांगितलं की, मुंबईतील काही लोक बॉम्ब बनवत असून ते कंट्रोल रूमला उडवण्याच्या तयारीत आहेत. यानंतर पोलीस अॅक्टीव्ह झाले आणि त्यांनी याप्रकरणी तातडीनं तपास सुरू केला. या तपासात जे काही उघडकीस आलं ते अनपेक्षितचं होतं.
दारू पिऊन कॉल केला होता : पोलीस तपासात आढळून आलं की, ती व्यक्ती दारूच्या नशेत होती. तिनं दारू पिऊन हा कॉल केला होता. मुंबईच्या बांगूर नगर पोलीस स्टेशननं या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
या आधीही आले आहेत धमकीचे कॉल : मुंबई पोलिसांना या आधीही धमकीचे असे अनेक कॉल आले आहेत. जुलै महिन्यात मुंबई पोलिसांना दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सनं भरलेला टँकर गोव्याला घेऊन जात असल्याचा एक कॉल आला होता. पोलिसांनी या प्रकरणी लगेच तपास चालू केला. तपासादरम्यान एक संशयित टॅंकर पकडण्यात आला. मात्र टँकरचा शोध घेतला असता त्यात कोणताही स्फोटक पदार्थ किंवा बॉम्ब सदृश वस्तू आढळली नाही.
२६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती : त्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करून मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती. या व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून हा कॉल केला होता. कॉलरनं एका विशिष्ट ठिकाणी एके-४७ रायफल आणि काडतुसं असल्याचं म्हटले होतं. या प्रकरणी वरळी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
- Threat Call To Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल; एक टँकर थांबवला अन्...
- Pune Crime News: रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला अटक, खोटा कॉल करण्याचे सांगितले धक्कादायक कारण
- Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत