मंबई - माजी परराष्ट्रमंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज मूल्याधिष्ठित राजकारणी होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
मूल्याधिष्ठित राजकारणी अचानक जाण्याने देशाचे नुकसान - महादेव जानकर - RIPSushmaSwaraj
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज मूल्याधिष्ठित राजकारणी होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी शोकभावना राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
महादेव जानकर
जानकर म्हणाले, सुषमाजी या अभ्यासू नेत्या होत्या. त्यांची संसदेतील भाषणे आजच्या तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहेत. एक उत्तम संसदपटू तसेच अभ्यासू भाषण असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, २००९ ते २०१४ लोकसभा विरोधी पक्षनेत्या यासह अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांच्या प्रत्येक पदाला त्यांनी न्याय दिला. सुषमाजींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.