मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा आलेख पाहता, राज्यातील शिवसेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र उरलेल्या आठ मंत्र्यांकडे कोणती खाती येणार याविषयी कयास लावले जात आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या वाट्याला खालील खाते येण्याची शक्यता वर्तविली जातं आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी मंत्रीपदे : अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण पदाची जबाबदारी येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दिलीप वळसे पाटील - गृहनिर्माण मंत्री, हसन मुश्रीफ - अल्पसंख्यांक मंत्री, धनंजय मुंडे - क्रीडा व युवक कल्याण, अनिल पाटील - पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, धर्मरावबाबा आत्राम - इतर मागास व बहुजन कल्याण, संजय बनसोड - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, अतिदि तटकरे - महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.