मुंबई- केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहातून मंजूर करून त्याचे कायद्यात रूपांतर केले. या विधेयकाच्या विरोधात देशभरात वातावरण पेटले आहे. आज मुंबई विद्यापीठातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. विद्यापीठाच्या कालिना संकुलात विविध पुरोगामी संघटनाच्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करून आपला विरोध दर्शवीला.
नागरिकत्व संशोधन विधेयकाचा विरोध ; पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने - नागरिकत्व संशोधन विधेयक बातमी
केंद्रातील भाजपने नागरिकत्व संशोधन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून देशाला आणि संविधानाला धर्माच्या आणि जातीच्या नावाने तोडण्याचे काम केले असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला.
![नागरिकत्व संशोधन विधेयकाचा विरोध ; पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने cab-protest-in-mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5394660-thumbnail-3x2-mum.jpg)
हेही वाचा-दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे
केंद्रातील भाजपने नागरिकत्व संशोधन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून देशाला आणि संविधानाला धर्माच्या आणि जातीच्या नावाने तोडण्याचे काम केले असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला. या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंग आणि तुषार गांधी हेही सहभागी झाले होते. या विधेयकाला विरोध करणाऱ्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. याचा निषेध करण्यात आला. यात छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, सीवायएसएफ, एसएफआय, एनएसयुआय, या सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्यार्थी या निदर्शनात सहभागी झाले होते. अचानक झालेल्या निदर्शनामुळे पोलीस प्रशासनही हादरून गेले होते. मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच इतर संघटना, पुरोगामी आणि संविधानवादी विद्यार्थी संघटना निषेध करण्यासाठी आंदोलनात सामील झाल्या होत्या.