महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भायखळा-परळ उड्डाणपुलावरून रात्रीची वाहतूक बंद - मुंबई भायखळा-परळ उड्डाणपुल लेटेस्ट न्युज

दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाच्या उड्डाणपुलांपैकी परळ भायखळा उड्डाणपूल आहे. या पुलावरून दररोज पहाटे भायखळात भाजी मार्केटमध्ये माल वाहतुकीची शेकडो वाहने दाखल होतात. मात्र आता रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत वाहतुकीसाठी पूल बंद राहणार आहे.

भायखळा उड्डाणपुल
भायखळा उड्डाणपुल

By

Published : Mar 24, 2021, 7:55 PM IST

मुंबई - मध्य व दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपूल म्हणून भायखळा-परळ उड्डाणपुलाकडे पाहिले जाते. याच उड्डाणपुलाच्या पीयर्सचे बेअरोंग व सांधे बदलण्याचे काम मुंबई महानगर पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज (बुधवार) रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी बुधवारी २४ मार्चपासून १५ जूनपर्यंत केली जाईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपआयुक्त (दक्षिण) योगेश कुमार यांनी दिली आहे.

उड्डाणपुलाखालून वाहतूक
कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परळ उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक पुढील तीन महिने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत परळ-भायखळा उड्डाणपुलाखालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मार्गक्रमण करेल. तसेच भायखळाहून परळकडे जाणारी वाहतुकही रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून वळवण्यात येईल. या काळात भोईवाडा वाहतुक विभाग व भायखळा वाहतूक विभाग हद्दितील लालबाग उड्डाणपुलाने पीयर्सच्या बेअरोंग व सांधे बदलण्याचे दुरूस्तीचे काम मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येणार आहे. सदर कामाकरीता लालबाग ब्रिज वाहतूकीकरीना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

पहाटे होणार वाहतूक कोंडी
दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपुलांपैकी परळ भायखळा उडान पूल आहे. या पुलावरून दररोज पहाटे भायखळात भाजी मार्केटमध्ये माल वाहतुकीचे शेकडो वाहने दाखल होतात. मात्र आता रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत वाहतुकीसाठी पूल बंद राहणार आहे. त्यामुळे वाहन पुलाखालून भायखळा भाजी मार्केट गाठावे लागणार आहे. यामुळे पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.

मार्गदर्शक फलक लावणार
पोलिसांकडून वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक या मार्गावर मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. वाहन चालकांची कमीत-कमी गैरसोय व्हावी आणि रहदारी सुरळीत सुरू राहावी, असा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा-वाचा...आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details