महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

By Elections 2022 : देशातील 6 राज्यांच्या 7 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक - केंद्रीय निवडणूक आयोग

देशात पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission )6 राज्यांतील 7 जागांवर पोटनिवडणूक (By-election) जाहीर केली आहे. या सर्व जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या जागा महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. निवडणूक आयोगानुसार या सर्व जागांवर 7 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होणार आहे.

By Elections 2022
पोटनिवडणुकांचे बिगुल वाजले

By

Published : Nov 3, 2022, 7:34 AM IST

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) सहा राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या सर्व जागांवर 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या जागा महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. निवडणूक आयोगानुसार या सर्व जागांवर 7 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासह, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरियाणातील आदमपूर, तेलंगणा, मनुगोड, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर (राखीव) या जागांवर निवडणुका घेण्यात येणार आहे.

17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार :निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतो. ज्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ, हरियाणातील आदमपूर, बिहारमधील मोकाम आणि गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी इस्ट, तेलंगाणातील मुनुगोडे आणि ओदिशातील धामनगर मधील जागेचा समावेश आहे.

अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणूक : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे नेमके काय होणार? याचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कारण एकीकडे चिन्हाची लढाई सुरु असतानाच निवडणूक आयोगाने आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरतानाच ठाकरे गटाकडे धनुष्यबाण राहणार की, त्यांना धनुष्यबाण गमवावे लागणार याचे उत्तर मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details