मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 141 च्या होऊ घातलेल्या पोटनिवडणूक मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. मतदनाकरिता मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या निवडणुकीत 18 उमेदवार उभे आहेत. तर 32 हजार मतदारांची संख्या आहे.
प्रभाग क्रमांक 141 च्या मतदानाला सकाळपासून सुरुवात - mumbai news
राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण तयार होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार बनले आहे. याठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्षाचे उमेदवार उभे आहेत.
हेही वाचा-जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?
राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण तयार होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार बनले आहे. याठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सर्वच पक्षाचे उमेदवार उभे आहेत. भाजपकडून बबलू पांचाळ, शिवसेना विठ्ठल लोकरे, काँग्रेसचे अल्ताफ काझी उभे आहेत. या मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठी मतदारांसह मुस्लीम, दलित व इतर भाषिक आहेत. या निवडणुकीचा उद्याच निकाल असून माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे बाजी मारणार का? हे काही तासात समजणार आहे.