मुंबई :असे मानले जाते की धनत्रयोदशी ही अशी वेळ असते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करते ( Lakshmi goes to devotees homes ). त्यामुळे लक्ष्मीचे रूप म्हणून सोने घरी आणतात. जाणून घेऊयात यामागील कथा आणि मुहूर्त. धनत्रयोदशी दिवशी सोने-चांदी खरेदी केली तर घरात समृद्धी येते. त्यामुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदीची खरेदी करतात. धनत्रयोदशीला हिंदीत धनतेरस देखील म्हणतात. देशभरात दिवाळी मोठ्या थाटात साजरी केली ( Diwali Celebration ) जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करतात. पाच दिवसांच्या दिवाळीची या दिवशी सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते. असे म्हटले जाते की, धनत्रयोदशी दिवशी सोने-चांदी खरेदी केली तर घरात समृद्धी येते. त्यामुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदीची खरेदी करतात.
धनत्रयोदशीची अख्यायिका :एका पौराणिक कथेनूसार, हिमा राजाच्या नवविवाहीत पत्नीने सोन्याची मदत घेऊन त्याचे प्राण वाचवले होते. राजाचे प्राण न्यायला यम आल्यावर राणीने राजाला सोन्याच्या ढिगात लपवले. त्या सोन्याची उजाळी पाहुन यमाचेही डोळे दिपले आणि तो राजाला शोधू शकला नाही. तेव्हापासून सोन्याला महत्त्व प्राप्त झाले अशी आख्यायिका ( Dhantrayodashi Story ) आहे.