महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: रिक्षामुळे चोरटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात; घरफोडीनंतर दागिने घेऊन झाले होते फरार - Burglars arrested in Mumbai

कुर्ला पश्चिम येथील रामा जिवा चाळीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी भक्ती रोहन वाले (वय 20) या गृहिणीने तक्रार दाखल केली होती. कुर्ला पोलिसांनी तपास करून चार आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद इजाज मोहम्मद रशीद शेख (वय 42 वर्षे), किरण किसन चव्हाण (वय २३ वर्षे), मोहम्मद अमजद अब्दुल हई शेख (वय 45 वर्ष) आणि मोहम्मद सोहेल उमर कुरेशी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Mumbai Crime
मुंबई पोलिसांकडून अटक

By

Published : Feb 18, 2023, 7:21 PM IST

मुंबई:अटकेतील चारही आरोपींविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३८० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती रोहन वाले (वय 20 वर्षे) ही गृहिणी रामा जिवा चाळ, कुर्ला पश्चिम येथे राहण्यास असून त्यांच्या राहत्या घरी ६ फेब्रुवारीला मध्यरात्री ३ ते वाजताच्या सुमारास चोरी झाली होती. त्यानंतर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भक्ती या गृहिणीने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या घरातून एकूण 1 लाख 95 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि गृहपयोगी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या.


घरफो़डी करून चोरटे पसार: चोरट्यांनी ३५ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडंट, त्याचे मूल्य १ लाख २० हजार, ५ ग्रॅमच्या २ अंगठ्या त्याची किंमत २५ हजार, ८०० रुपये किमतीची सिटीझन कंपनीची 2 घड्याळे आणि ८०० रुपये किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ असा एकून १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होवाळे यांनी सांगितले की, तक्रादार महिला या काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता तीन अज्ञात इसमांनी घरफोडी करून त्यांच्या घरातील सोने व चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. म्हणून भारतीय दंड संविधान कलम 380 आणि 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


असा घेतला चोरट्यांचा शोध:सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथक हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळी आणि आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले गेले. त्यावेळी गुन्हा करण्यास वापरण्यात आलेली रिक्षा क्रमांक प्राप्त करून त्या रिक्षा मालकाच्या पत्यावर पोलीस गेले. मात्र, तिथे नमूद पत्ता पोलिसांना सापडला नाही. गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारीला गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हे लोटस कॉलनी, गोवंडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोवंडी येथील ठिकाणी जाऊन पोलीस शोध घेऊन सापळा रचून होते. दरम्यान शिताफीने एकूण चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे कुर्ला पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला.

अटकेतील आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड: अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी २ आरोपी हे हिस्ट्री शिटर आहेत. चारही आरोपी जिवंडी आणि शिवाजी नगर परिसरात राहणारे आहेत. मोहम्मद इजाज मोहम्मद रशीद शेख 42 वर्षे याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर मोहम्मद सोहेल उमर कुरेशी (वय 37 वर्षे) याच्यावर वाकोला पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच २०२० मध्ये विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात, २०२२ मध्ये साकीनाका पोलीस ठाण्यात आणि २०२१ मध्ये माहीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद सोहेल उमर कुरेशी याच्यावर याआधी ६ गुन्हे दाखल आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा:NIA Seized Three Cars Used By Terrorists : एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनेत वापरलेल्या तीन कार केल्या जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details