मुंबई - सोन्याच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील डझनभर लोकांना फसवून फरार झालेल्या बंटी आणि बबलीला मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. या पती-पत्नीने तक्रारदाराची ३५ लाखांची फसवणूक केली आहे. बंटी आणि बबली या दोघांना (२०१५)मध्ये मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका घोटाळ्यात अटक केली होती. परंतु, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सध्या बंटी आणि बबली दाम्पत्य तुरुंगात आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून लाखोंचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
करोडोंची फसवणूक करणारे अटक करोडोंची फसवणूक करणारे अटक पोलीस अधिकारी विजय माडये यांची महिती
वैशाली उर्फ प्रीती जैन उर्फ पिंकी दमानिया (४७) आणि तिचा पती जिग्नेश दमानिया हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे व्यापारी असल्याची बतावणी करून लोकांना सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायला लावत. ज्याचे ते कॅरेटमध्ये रूपांतर करून बाजारभावाने विकतील. त्या बदल्यात त्याला चांगला परतावा मिळेल. पोलिसांनी सांगितले की, बंटी आणि बबलीला २६ फेब्रुवारी रोजी दिंडोसी महामार्गावरून अटक करण्यात आली होती. प्रत्येक गुन्ह्यानंतर अटक टाळण्यासाठी तो भाड्याचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे आतापर्यंत आठ तक्रारी आल्या असून, त्यात फसवणुकीची रक्कम कोट्यवधींची असल्याची सांगितले.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध; 'गो बॅक मोदी' अशी घोषणाबाजी