महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lanja Taluka locals Matter: लांजा तालुक्यात घडत आहेत लोकशाहीची थट्टा करणाऱ्या घटना, पराभूत उमेदवारांची दादागिरी - आगवे गाव

लांजा तालुक्यामध्ये (Lanja Taluka Matter) नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने मतदानाचा अधिकार बजावून ग्रामपंचायत आगवेमध्ये प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे यांना सरपंच पदी बहुमताने निवडून दिले. प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे यांच्या सोबत असलेल्या इतर तिघांचाही पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी (Bullying of defeated candidates) अनिल गुरव, योगेश मोरे, अनंत रायकर आणि प्रफुल्ल कांबळे यांच्याकडून स्थानिकांना त्रास (locals are being harassed) देण्यात येत आहे.

Lanja Taluka locals Matter
पराभूत उमेदवारांची दादागिरी

By

Published : Dec 28, 2022, 7:20 PM IST

मुंबई : लांजा तालुक्यातील (Lanja Taluka Matter) आगवे गावात लोकशाही मार्गाने पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने (Bullying of defeated candidates) अनिल गुरव, योगेश मोरे आणि अनंत रायकर या तिघांकडून दादागिरी, दडपशाही आणि देवदेवस्कीची भीती घालून गावकऱ्यांना मंदिरात वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. गावचे पोलीस पाटील विजय जोशी यांचा या सर्व प्रकाराला पाठिंबा असल्याने, पराभूत उमेदवारांकडून ग्रामस्थांना त्रास (locals are being harassed) देण्याची हिंमत वाढली आहे. पोलीस किंवा अन्य कोणाकडे तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ घाबरले आहे आणि या पराभूत उमेदवार आणि गावचे पोलीस पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रफुल्ल कांबळेंना सरपंच पद :लांजा तालुक्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने मतदानाचा अधिकार बजावून ग्रामपंचायत आगवेमध्ये प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे यांना सरपंच पदी बहुमताने निवडून दिले. प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे यांच्या सोबत आगवे गावातून अन्य तीन उमेदवार सरपंच पदाच्या रिंगणात होते. परंतु प्रफुल्ल कांबळे यांच्या समोर इतर तिघांचाही पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्थानिकांना त्रास देण्यात येत आहे.



पोलीस पाटीलला निलंबित करण्याची मागणी : मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल कांबळे हे बौद्ध समाजाचे आहेत. गावाने एकमताने त्यांना सरपंच पदी निवडून दिले. बौद्ध समाजाच्या व्यक्तीला मतदान केल्याचा राग मनात धरून ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याचे काम अनिल गुरव, योगेश मोरे आणि अनंत रायकर करत आहेत. तिघांकडून सर्व ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना गावातील मंदिरात बोलावून बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी, त्यांच्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली जात आहे. तसेच बौध्द समाजाच्या उमेदवाराला निवडून दिले म्हणून ग्रामस्थांनी २१ लाख रुपये दंड भरावा, अन्यथा बघून घेण्याची अर्वाच्च भाषा वापरली जात आहे. इतकेच नाहीतर हा सर्व प्रकार गावा बाहेर कोणालाही समजू नये म्हणून सर्व ग्रामस्थांना देवाच्या समोर शपथ घ्यायला लावण्याचा निंदनीय प्रकार सुरू केला आहे. गावाच्या पोलीस पाटलाचा देखील या सर्व प्रकारात हात आहे. पोलीस पाटील हे प्रशासनाचे अधिकारी असूनही, असे खालच्या पातळीच कृत्य करणाऱ्या लोकांना साथ देत असल्याने त्यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे, अशी आगवे गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.


संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी : देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाली. तरी लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात जातपात आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून लोकशाहीला बाधा पोहचवण्याच षढयंत्र सुरू आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरपंच निवड थेट जनतेतून झाल्यानंतर ग्रामस्थांना योग्य वाटणारा सरपंच निवडून दिला. पण मतदानाचा हक्क बजावणे आगवे गावातील ग्रामस्थांच्या अंगलट आले आहे. गेली अनेक वर्षे निवडणूक कालावधीत आगवे गावात असे प्रकार वारंवार घडतात. परंतु दादागिरी, दडपशाही आणि देवदेवस्कीच्या भीतीने कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे पोलीस पाटील यांच्यासह सर्वांचे फावल्याने संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details