महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bulli Bai App Case : बुली बाई प्रकरणातील मुख्य आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी - बुली बाई अँप केस

बुली बाई अॅपचा कथित ( Bulli Bai App ) संस्थापक आणि प्रमुख आरोपी नीरज बिश्नोई याची मुंबईतील वांद्रे कोर्टाने न्यायालयीन ( Niraj Bishnoi Send To Police Custody ) कोठडीत रवानगी केली आहे. नीरज बिश्नोईला दिल्ली पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या आधी नीरज बिश्नोई यांचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने ( Delhi Court rejects bail plea of Niraj Bishnoi ) फेटाळला होता.

mumbai
mumbai

By

Published : Jan 31, 2022, 11:49 PM IST

मुंबई - बुली बाई अॅपचा कथित ( Bulli Bai App ) संस्थापक आणि प्रमुख आरोपी नीरज बिश्नोई याची मुंबईतील वांद्रे कोर्टाने न्यायालयीन ( Niraj Bishnoi Send To Police Custody ) कोठडीत रवानगी केली आहे. नीरज बिश्नोईला दिल्ली पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या आधी नीरज बिश्नोई यांचा जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने ( Delhi Court rejects bail plea of Niraj Bishnoi ) फेटाळला होता. आरोपीने सार्वजनिक मंचावर एका विशिष्ट समुदायाच्या अनेक महिला पत्रकारांना शिवीगाळ आणि अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे जातीय सलोख्यावर नक्कीच विपरीत परिणाम होणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण -

बुली बाई ( Bulli Bai App ) या अ‍ॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अ‍ॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अ‍ॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

कोण आहे नीरज बिष्णोई -

नीरज बिष्णोई असे या मुख्य आरोपीचे पूर्ण नाव असून तो 20 वर्षाचा आहे. आसामच्या जोरहाटमधील दिगंबर भागातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे.

हेही वाचा -Nashik : वाईनला विरोध करणार्‍यांच्या साखर कारखान्यात दारु तयार होते; भुजबळांचा विरोधकांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details