मुंबईBullet Train Work:आधीच मेट्रोच्या कामकाजामुळं मुंबई येथील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जवळील रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आलीय. आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रेल्वे स्थानकासाठी पुन्हा बारा महिने दोन रस्ते जोखीम सुरक्षा कारणाने बंद राहणार आहे. त्यामुळं प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
बुलेट ट्रेन मार्गाचं काम :अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्गाचं काम केंद्र शासनानं जोरदारपणे सुरू केलंय. आज 12 सप्टेंबर रोजी दुपारपासून पुढील 12 महिने वांद्रे कुर्ला संकुलाजवळील दोन रस्ते बंद राहतील. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेल्या कामात अडथळा येऊ नये, म्हणून पुढील एक वर्ष हे रस्ते बंद राहणार आहेत. 2024 मध्ये जून महिन्यात हे दोन्ही रस्ते पुन्हा खुले होतील.
मेट्रोच्या कामकाजामुळे काही प्रमाणात रस्ते अरुंद झालेच होते. परंतु मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी कोणतीही जोखीम नको, नागरिकांच्या सुरक्षतेसाठी काही काळ हे दोन रस्ते बंद राहणार आहेत.- सहाय्यक पोलीस आयुक्त ट्राफिक विभागाचे प्रवीण पडवळ
वांद्रे कुर्ला संकुलामध्ये रेल्वे स्थानक : अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्गाचे काम वेगानं सुरूय. त्यासाठीचं रेल्वे स्थानक वांद्रे कुर्ला संकुलामध्ये केलं जातंय. त्या कामकाजात अडथळा नको. सुरक्षा नको, कोणतीही जोखीम नागरिकांना होऊ नये. म्हणून मोतीलाल नेहरू नगरपर्यंत जे. एस. डब्ल्यू. कंपनी सेंटर ते प्लॅटीना बिल्डिंग असे दोन मार्ग (Bandra Kurla roads) बारा महिन्यांसाठी बंद राहणार आहेत.
'अशा' प्रकारे रस्ता बंद : तसंच वांद्रे कुर्ला संकुलाच्या जवळील एमपी जंक्शन ते डायमंड बोर जंक्शनपर्यंत डावीकडे जाणारा रस्ता बंद असेल. तसेच त्यानंतर उजवीकडे वळण घेऊन पुढे खेरवाडी वांद्रे पूर्वेकडे जाणारा रस्ता बंद असेल. डायमंड बाजार जंक्शनपासून ते जेएसडब्ल्यू सेंटर आणि एमएमआरडीए कार्यालयाकडे जाणारा रस्ता ते बीकेसी रोड दहापासून प्लॅटिना जंक्शन उजवीकडचे ट्रेड सेंटरपर्यंत हा रस्ता बंद राहणार (bullet train work two roads will remain closed) आहे.
हेही वाचा :
- Semi Bullet Train : राज्यात लवकरच धावणार सेमी बुलेट ट्रेन, २५ टक्के भूसंपादन पूर्ण
- Bullet Train BKC Station : बीकेसीवर बुलेट ट्रेनच्या कामाला गती; बांधकामासाठी 19 जूनला निविदा काढणार
- Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; बीकेसी स्थानकाबाबत 'या' तारखेला रोजी निविदा जारी होणार