मुंबई :बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (mumbai ahmedabad bullet train) वांद्रे कुर्ला संकुल येथील स्टेशनच्या डिझाईन आणि बांधकामासाठी कमर्शियल बिड खुले करण्यात आले आहेत. यापूर्वी या कामसाठी टेक्निकल बिडमध्ये पात्र झालेल्या 3 बोलीदारांच्या कमर्शियल बिड नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (National High Speed Rail Corporation limited) लिमिटेडच्या वतीने उघडण्यात आल्या. या 1800 कोटींच्या निविदेसाठी (1800 crores tender announced) मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड, एमईआय एलएचसीसी संयुक्त उपक्रम आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
वांदे कुर्ला संकुलात काय होणार काम ? :वांदे कुर्ला संकुलात पॅकेज सी-1 अंतर्गत बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक होणार आहे. या स्थानकाकरि ता 467 मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यात (Bullet train work in Mumbai will start soon ) येणार आहे. त्यासाठी 66 मीटरच्या टनेल वेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या उभारणीसाठी एक हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक 4.9 हेक्टर जागेत उभारले जाणार आहे. 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार असून प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक उभारण्यात येणार आहे. अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी दिली.
काय आहे कामांसाठी कालमर्यादा ? :मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अहमदाबाद ते वापी हा 350 किलोमीटरचा मार्ग 2028 मध्ये पूर्ण होऊन तो सेवेत येईल. तत्पुर्वी सुरत ते बिलिमोरा मार्ग 2026 पर्यंत सेवेत आणण्याचे उद्धिष्ट आहे. महाराष्ट्रातील 98 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. हे संपूर्ण भूसंपादन केल्यानंतर प्रकल्पाची अंतिम मुदत निश्चित होईल. सध्या सुरतमध्ये बुलेट ट्रेनचे स्थानक, उन्नत मार्गिकेसाठी गर्डर बसविण्याचा कामांना वेग दिला जात असून विविध कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय प्रकल्पात येणाऱ्या सात नद्यांवर पूलही बांधण्यात येणार असल्याचे गैौर यांनी सांगितले.
आता होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात :एकूण 508 किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनची स्थानके असतील. कमर्शियल बिडमुळे आता वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळेल. या टेंडरमध्ये मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम तसेच एमईआय एलएचसीसी संयुक्त उपक्रम यांनी सर्वात कमी बोली लावली. तर या संदर्भातील तांत्रिक निविदा 4 नोव्हेंबर 2022 रोजी खुल्या केल्या होत्या, असे सुषमा गौर यांनी सांगितले. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी स्टेशन उभारणीच्या कामासाठी लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.