महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या ठाणे येथील स्टेशनचे अद्याप कामही सुरू नाही - Maha Vikas Aghadi Govt

Bullet Train: राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बुलेट ट्रेनचा प्रकल्प जलद गतीने व्हावा, यासाठी शिंदे फडणवीस सरकारने जोर लावलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) काळामध्ये महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचं काम जवळजवळ थांबले होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने (Thane still not working) सर्वात आधी बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केली होती. ठाण्यात बुलेट ट्रेनच्या स्टेशनचं अद्याप कामच सुरू झाले नाही.

Bullet Train
Bullet Train

By

Published : Dec 21, 2022, 8:00 PM IST

ठाणे येथील स्टेशनचे अद्याप कामही सुरू नाही

मुंबई:मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. गुजरात राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अत्यंत जलद गतीने होत असलं तरी, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या कामाला गती देण्याचा काम सुरू आहे. मात्र सध्या जमीन अधिग्रहणाशिवाय इतर काम झालेले दिसत नाही. ठाण्यात बुलेट ट्रेनच्या स्टेशनचं अद्याप कामच सुरू झालेलं नाही.

बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी: राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बुलेट ट्रेनचा प्रकल्प जलद गतीने व्हावा, यासाठी शिंदे फडणवीस सरकारने जोर लावलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचं काम जवळजवळ थांबले होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने सर्वात आधी बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाऊल उचलायला सुरुवात केली होती. पालघर ठाणे येथील जमीन अधिग्रहणाच्या काम राज्य सरकारने सर्वात आधी हाती घेतलं.

138 हेक्टर जागा हस्तांतरित:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहणात खास लक्ष देऊन लवकरात लवकर जमीन अधिग्रहण होईल. यासाठी बैठकांचे सत्र सुरू केलं होतं. आता जमीन अधिग्रहणाचं काम मुंबई ठाणे आणि पालघर असं तिने जिल्ह्यामधून जवळपास 98 टक्के पूर्ण झाला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात 288 हेक्टर तर, ठाणे जिल्ह्यामध्ये 138 हेक्टर जागा हस्तांतरित होणे आवश्यक होतं. त्यानुसार जमीन अधिग्रहण जवळजवळ पूर्ण झाल आहे.

कामाला सुरुवातच नाही:जमीन अधिग्रहणाचा काम राज्य सरकारने पूर्ण केलं असलं तरी, ठाणे येथे होणार बुलेट ट्रेनच्या स्टेशनचं काम अद्याप सुरूच झालेलं नाही, अशी परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या दिवा परिसरामधील बेतवडे, म्हातर्डे, आगासन या गावात बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार आहे. यासाठी स्थानिक शेतकऱ्यांशी जमीन देखील घेण्यात आली आहे. राज्य सरकारकडून स्टेशन परिसरात येणारी काही घर देखील तोडण्यात आली आहेत. मात्र अद्याप स्टेशनच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. अद्यापही एकही वीट स्टेशनसाठी रचण्यात आलेली नाही. बेतावडे, म्हातर्डे, आगासन गाव परिसरात हे स्टेशन होणार आहे.

मुंबई अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट: या गावाच्या जवळून सेंट्रल रेल्वे जाते. त्यामुळे ठाण्याचं बुलेट ट्रेन स्टेशन या भागामध्ये होऊन सेंट्रल रेल्वेची ते जोडलं जाईल, आणि गुजरातहून ठाणे परिसरात येणाऱ्या व्यापारी किंवा इतर नागरिकांना ठाणे आणि इतर परिसरामध्ये जाण्यासाठी लोकल ट्रेन उपलब्ध होईल, अशी कनेक्टिव्हिटी या स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबतचे आयोजन 'मुंबई अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट' च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम अत्यंत जलद गतीने होत असलं, तरी राज्य सरकारमध्ये जमीन अधिग्रणाशिवाय सध्या इतर कामासाठी पुढाकार झालेला दिसत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details