महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयआयटी मध्ये नंदन निलंकेणी नावाने इमारत - बॉम्बे बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचा निर्णय - नंदन नीलेकणी

मुंबई आय आय टी चे माजी विद्यार्थी आणि इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलकेणी यांनी आयटीला दिलेल्या भरीव योगदाना बद्दल, मुंबई आयआयटीच्या बॉम्बे बोर्ड ऑफ गव्हर्नन्स कडून आवारातील एका इमारतीला 'नंदन निलकेणी इमारत' या असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Building named after Nandan Nilankeni in IIT
आयआयटी मध्ये नंदन निलंकेणी नावाने इमारत

By

Published : Jul 27, 2023, 1:57 PM IST

मुंबई :आयआयटीमध्ये जे विद्यार्थी शिकले आणि जे देशात आणि विदेशात विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अशा सर्वांना आयआयटीला 65 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आमंत्रित केले होते. अनेक तंत्रज्ञ, तज्ञानी या समारंभाला उपस्थिती दर्शविली. त्यात नंदन नीलेकणी हे देखील मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित होते. नीलेकणी हे इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही संकल्पना त्यांनी वास्तवात आणली आहे.

त्यांचा आज आय आय टी मुंबई येथे सत्कार करण्यात आला. आयआयटीने माझ्या जीवनाला आकार दिला असे गौरवउद्गार त्यांनी काढले ते म्हणाले, या अतुलनीय सन्मानासाठी मी आयआयटी बॉम्बेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचा मनापासून आभारी आहे. आयआयटी बॉम्बेने माझ्या आयुष्याला आकार दिला आहे. आणि मी आयआयटी बॉम्बे, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्य बाबत।कृतज्ञता व्यक्त करतो.. आणि इतर प्रत्येकजण ज्याने मला संस्थेला पुढे जाण्यास मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

हा सन्मान प्रतिष्ठित आय आय टी मधील प्रत्येक विद्यार्थ्याला समर्पित करतो .मला आशा आहे की यामुळे भावी पिढीला चांगले करण्याची आणि घडवण्याची प्रेरणा मिळेल. नंदन निलकेणी यांचा अनमोल वाटाकार्यक्रमात आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. सुभाषिस चौधरी म्हणाले, आयआयटी बॉम्बे नेहमीच संशोधन आणि विकास क्षेत्रात पुढे आहे. शैक्षणिक उत्कृष्टता निर्माण करण्याच्या दिशेने आयआयटीचा प्रयत्न आहे. सामाजिकदृष्ट्या प्रभावी तंत्रज्ञान नवकल्पना विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबई प्रयत्नशील असते. जे भारताच्या वाढीच्या आणि आत्मनिर्भरतेच्या पुढील टप्प्याला चालना देईल.निलंकेणी सारखे योगदान देणारे विद्यार्थी यांचा अनमोल वाटा यात आहे.

मानवा समोरील आव्हाने आणि विज्ञान तंत्रज्ञाना समोरच्या अडचणी पाहता त्यात आणखी संशोधन आणि विकास व्हावा यासाठी नंदन निलकेणी यांनी आयआयटीला नुकतीच 400 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या पुर्वी त्यांनी 85 कोटीची देणगी दिली होती. यात त्यांनी 315 कोटी रुपये वाढवुन दिले. शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी देणगी अशी नोंद या मुळे झाली आहे. त्यांनी या संदर्भातील एक करारही नुकताच आयआयटी सोबत केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details