मुंबई - शहरातील चुनाभट्टी परिसरात ८० वर्षांपासून उभी असलेल्या इमारतीची दुर्दशा झालेली आहे. या इमारतीच्या सर्व बाजूचे कठडे तुटले आहेत. त्यामुळे रहिवासी जीव धोक्यात घालून दोरीचा आधार दररोज ये-जा करतात. दररोज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे १२३ कुटूंबे भितीच्या छायेत जगत आहेत.
मुंबईतील चुनाभट्टीत इमारतीची दुर्दशा; १२३ कुटुंबाचा जीव धोक्यात - मोडकळीस आलेल्या इमारती
चुनाभट्टी येथील ही ३ मजली इमारत गिरणी कामगारांसाठी उभी करण्यात आली होती. मात्र, सध्या ही इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या छतातून देखील पाण्याची गळती होत आहे. या इमारतीचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे रहिवाशी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.
![मुंबईतील चुनाभट्टीत इमारतीची दुर्दशा; १२३ कुटुंबाचा जीव धोक्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3991646-thumbnail-3x2-mumbai.jpg)
नुकतीच डोंगरी येथे इमारतीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, पुनर्वसन चांगल्या ठिकाणी होत नसल्याने मुंबई शहर व उपनगरातील जीर्ण इमारतींमध्ये हजारो कुटूंब राहत आहेत. चुनाभट्टी येथील ही ३ मजली इमारत गिरणी कामगारांसाठी उभी करण्यात आली होती. मात्र, सध्या ही इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या छतातून देखील पाण्याची गळती होत आहे. या इमारतीचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे रहिवाशी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.
चुनाभट्टीतील या इमारतीत गिरणी कामगार १२३ कुटूंब वास्तव्यास आहे. यापूर्वी येथे २५० कुटूंब राहत होते. मात्र, काहींनी घरे भाड्याने दिली आहेत, तर काही लोक इमारत सोडून गेले आहेत. मात्र, इमारतीची अवस्था बदलेल या आशेने आम्ही आजही या धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच शहरात इमारती कोसळल्याच्या दुर्घटना ऐकल्या की मनात धडकी भरत असल्याचे रहिवाशी म्हणाले.