मुंबई- शहरातील डोंगरी भागात इमारत कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर आता सगळ्याच महापालिका जाग्या झाल्या आहेत. महापालिकांनी अतिधोकादायक बांधकामांवर हातोडा सत्र सुरू केले आहे. डोंगरी सारख्या घटना घडू नयेत म्हणून अशा प्रकारच्या कारवायांना गती मिळाली आहे.
डोंगरी सारखे अपघात टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारतींवर महापालिकेचा हातोडा - Dongri
मुंबईतील डोंगरी येथे परवा घडलेल्या घटनेनंतर आता सगळ्याच महापालिका जाग्या झाल्या असून धोकादायक व अतिधोकादायक बांधकामांवर हातोडा सत्र सुरु केले आहे.
अतिधोकादायक इमारतींवर हातोडा
ठाण्यातील हरी निवास सर्कल येथील खंडू निवास या अतिधोकादायक इमारतीवर बुधवारी तोडक कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने केवळ नौपाडा प्रभागात एकूण 46 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 42 इमारती तातडीने खाली करण्यात आल्या आहेत. या तोडक कारवाईमध्ये आतापर्यंत आठ इमारतींवर हातोडा चालविण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.
Last Updated : Jul 19, 2019, 11:05 AM IST