महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खारमध्ये 5 मजली इमारतीचा भाग कोसळला; 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

खार जिमखाना येथील १७ व्या रस्त्यावर बोहाला ही तळ अधिक चार अशी पाच मजली खासगी इमारत आहे. मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास या इमारतीच्या तळ मजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंतचा जिन्याचा भाग कोसळला.

खारमध्ये 5 मजली इमारतीचा भाग कोसळला

By

Published : Sep 24, 2019, 4:02 PM IST

Updated : Sep 24, 2019, 7:04 PM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील खार येथील पाच मजली इमारतीच्या जिन्याचा काही भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला. या इमारतीमधील सर्व रहिवाशांना अग्निशमन दल व एनडीआरएफने बाहेर काढले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगी अडकली होती. या मुलीला एमडीआरएफ व अग्निशमन दलाने बाहेर काढून लीलावती रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला आहे. तसेच यातील दोन जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

खारमध्ये 5 मजली इमारतीचा भाग कोसळला

हेही वाचा-महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव


खार जिमखाना येथील १७ व्या रस्त्यावर बोहाला ही तळ अधिक चार अशी पाच मजली खासगी इमारत आहे. मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास या इमारतीच्या तळ मजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंतचा जिन्याचा भाग कोसळला. इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळताच बाजूच्या रहिवाशांनी इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना शिड्यांच्या सहाय्याने बाहेर काढले. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून २१ जणांना बाहेर काढण्यात आले. भावना वसंत आंचन (५० वर्ष) व सुरेखा भानूसाहेब लोखंडे (४० वर्ष) या दोन महिलांना पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचार करुन सोडून देण्यात आले. मात्र, या ठिकाणी खेळत असलेली एक मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली होती. या लहान मुलीला एनडीआरएफ व मुंबई अग्निशमन दलाच्या जावानांनी बाहेर काढले आहे. तिला जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माही मोतवानी असे या मुलीचे नाव असून ती दहा वर्षाची असल्याचे समजते.

इमारत पाडली जाणार -
दुर्घटनाग्रस्त पाच मजली बोहला ही इमारत खासगी मालकीची आहे. ही इमारत ४७ वर्ष जुनी असल्याचे समजते. इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्याने इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे इमारतीमधून सर्व रहिवाशांना बाहेर काढावे. तसेच जवळच्या पालिकेच्या शाळेत शेल्टर उभारून राहण्यास दिले जाणार आहे. येत्या काही दिवसात या इमारतीमधून रहिवाशांना आपले सामान काढू दिले जाणार. त्यानंतर ही इमारत मुंबई अग्निशमन दल व एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली पाडली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Sep 24, 2019, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details