महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील मालाड परिसरातील जीर्ण दुमजली चाळीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही - मुंबईत इमारत दुर्घटना

इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने इमारत रिकामी करत या दुर्घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलीस नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला पाचरण करून मलबा उचलण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबईतील मालाड परिसरातील जीर्ण दुमजली चाळीचा काही भाग कोसळला
मुंबईतील मालाड परिसरातील जीर्ण दुमजली चाळीचा काही भाग कोसळला

By

Published : Jul 16, 2020, 4:37 PM IST

मुंबई -शहरातील मालाड परिसरात जीर्ण दुमजली चाळीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाला या दुर्घटनेची माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. मालाडमधील मालवणी भागात ही ग्राऊड प्लस 2 अशी रहिवाशी इमारत आहे. या इमारतीचा काही भाग गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोसळल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने इमारत रिकामी करत या दुर्घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलीस नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला पाचरण करून मलबा उचलण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबईत पावसाळ्यात अशा दुर्घटना आता सर्रास होत असतात. याआधी काल मुंबईत चार ठिकाणी घर आणि भिंत कोसळण्याच्या तक्रारी नोंद झाल्या. दुपारी सव्वा एकच्या सुमारास ग्रॅंट रोड पाववाला लेन येथील एडनवाला या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामधील 20 कुटुंबीयांना मागाठाणे व गोराई येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. इमारतीत अडकलेल्या सकिना एडनवाला (75), मुर्तुझा एडनवाला (49) या दोघांना जवळच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इमारतीत अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details