महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंगरी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा - केसरबाई

मुंबईच्या डोंगरी भागात काल कोसळलेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहिती 14 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.

डोंगरी दुर्घटना

By

Published : Jul 16, 2019, 12:25 PM IST

Updated : Jul 17, 2019, 10:43 AM IST

मुंबई- दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई नावाची तळमजला अधिक चार मजली असलेली अवैध इमारत कोसळून मंगळवारी दहा जणांचा मृत्यू झाला होता. आज या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून एकूण मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. यामध्ये 7 पुरुष 4 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर 9 रहिवासी जखमी झाले आहेत. एनडीआरएफ, मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अद्यापही घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. ढिगार्‍याखाली 40 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर जखमींवर उपचारासाठी लागणारा सर्व खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.


डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. ढिगारा हटविण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. आज पहाटे अग्निशमन दलाने २ लहान मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. एक मुलागा 6 ते 8 वर्षाचा तर दुसरा 4 वर्षाचा आहे. जे जे रुग्णालयाने या दोघांनाही मृत घोषित केले आहे. अलानी इडरी नावाच्या 28 वर्षीय युवतीलाही पहाटे ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहे. ती जिवंत असून, तिच्यावर जेजे रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.

डोंगरी दुर्घटना : मृतांचा आकडा 14 वर


फायर विभागाचे अधिकारी जखमी

शोध मोहीम सुरू असताना भायखळा फायर विभागाचे अनिल कानडे (वय,23) हे जखमी झाले आहेत. ढिगारा उपसताना त्यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर इजा झाली आहे. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनास्थळाला आता राजकीय नेते, मंत्री भेट देत असल्यामुळे तेथील यंत्रणेवरदेखील ताण येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारती शेजारील इमारतींनाही तडे गेल्याने तेथील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, स्थानिक नागरिक बचावकार्यात काम करत आहेत. तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अरुंद गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत.

या इमारतीला 2017 मध्ये अतिधोकादायक इमारत म्हणून नोटीस देण्यात आली होती. मात्र, येथील रहिवाशांना राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने ते येथेच जीव मुठीत धरून राहत होते आणि आज त्यांच्यावर काळाने घाला घातला.

LIVE UPDATES -

  • मृत्यू झालेल्यांची नावे -
  1. साबिया निसार शेख (वय - 25)
  2. अब्दुल सत्तार कालू शेख (वय-55)
  3. शायरा रियाज शेख ( वय - 24)
  4. जावेद इस्माईल (वय 34)
  5. मुझामिल मनसुर सलमानी (वय 15)
  6. अरहान शेहजाद (वय 40)
  7. कश्यप अमीरजान (13)
  8. सना सलमानी(25)
  9. झुबेर मन्सुर सलमानी (20)
  10. इब्राहीम (दीड वर्ष)
  11. यामीन मन्सुरी (54)
  12. शेहजाह (8)
  13. अरबाज (7)
  • जखमींची नावे -
  1. फिरोज नाजिर सलमाना
  2. अनोळखी
  3. झीनत रेहमान
  4. आयेशा शेख
  5. सलमा अब्दुल शेख
  6. अब्दुल रेहमान
  7. नावेद सलमानी
  8. इमरान हुसेन कलवानिया
  9. जावेद (वय 30)
  • आणखी 2 जणांना ढिगाऱ्याखालून काढले

  • धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना घर भाडे देण्याबाबत राहुल शेवाळेंचे पालिका आयुक्तांना पत्र

  • या घटनेमुळे जेजे परिसरातील मोहम्मद अली रोड येथे मोठी वाहतून कोंडी झाली

  • या इमारतीला 2017 मध्ये अतिधोकादायक म्हणून नोटीस देण्यात आली होती
  • हाबीब रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू
  • ही ईमारत 100 वर्ष जुनी - मुख्यमंत्री
  • एका व्यक्तीसह लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश
  • 2 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी झाल्याची माहिती पालिकेने दिली
  • यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली
  • एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल
  • अग्निशामन दलाकडून बचावकार्य सुरू
  • 40 ते 50 जण अडकल्याची भीती, स्थानिकही बचावकार्यात
  • इमारत म्हाडाची असल्याची माहिती
  • इमारतीचा केला जाणार होता पुर्नविकास

प्रतिक्रिया -

विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते -

डोंगरीतील दुर्घटना हे पालिकेचे अपयश आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर खुनाचा गून्हा दाखल करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान -

डोंगरी येथे ४ मजली इमारत कोसळल्याची दुर्घटनेमुळे दुख: झाले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती आहे. मी आशा करतो, की जखमी लवकरात लवकर बरे व्हावे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक संस्था बचावकार्य करत आहेत.

रवींद्र वायकर, राज्यमंत्री -

कोसळलेली इमारत ही म्हाडा आणि मुंबई महापालिकेची नसून ती एका खासगी ट्रस्टची होती.

अश्विनी जोशी, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त -

डोंगरी परिसरातील कोसळलेल्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासाठी 2017 मध्येच नोटीस दिली होती. त्यानंतर स्ट्रकचरल ऑडिटमध्ये ही इमारत अतिधाकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. पोलिकेने म्हाडाला ही माहिती दिली होती. तसेच म्हाडानेही लोकांना या इमारतीमध्ये वास्तव्य करू नये, असे सांगितले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -

म्हाडाची १०० वर्ष जुनी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता, तसेच म्हाडाच्या अती धोकादायक इमारतीत तिचा समावेश नव्हता. विकासकाने काम वेळत केले की नाही? याची चौकशी केली जाईल.

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील -

डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना आज घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डोंगरी दुर्घटनेत जवळपास १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जयंत पाटील (आमदार, राष्ट्रवादी)

पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबई सह महाराष्ट्रात किड्यामुंग्यासारखी लोकं मरत आहेत. आधिवेशनात धोकादायक इमारती मोकळ्या करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न केल्यानं या दुर्घटना घटत असून याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे.

उदय सामंत ( अध्यक्ष, म्हाडा)

दुर्घटनाग्रस्त इमारत ही म्हाडाची नाही, त्यामुळे याला म्हाडा जबाबदार नाही.

भाई जगताप -

बचावकार्य पथक घटनास्थळी पोहोचले असून कार्य सुरु आहे. इमारत जिथे कोसळली ती गल्ली अरुंद असल्याने त्यात रुग्णवाहिकेला पोहोचण्यास त्रास होत आहे. ही इमारत म्हाडाची असून अतिधोकादायक वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आली नव्हती. ती समाविष्ट करण्यात आली नाही याचा पाठपुरावा करण्यात यावा.

अमीन पटेल

बचतकार्य पथक घटनास्थळी पोहोचले आहे, कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मलब्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या दोन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

धनंजय मुंडे (विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद)

ही १०० वर्षांपूर्वीची इमारत असून पुनर्विकासामध्ये आलेली इमारत होती. ती आज कोसळली. अर्ध्यातासापूर्वी स्थानिक नागरीकच मलबा काढत होते. घटनास्थळी इतक्या उशीरा एनडीआरएफ आणि महापालीकेचे कर्मचारी इथे पोहचले आहेत. यावरूनच सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

Last Updated : Jul 17, 2019, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details