महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदीमुळे बिल्डरांची वाताहत... - मुंबई बांधकाम व्यवसायिक बातमी

लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी बिल्डर झटतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर मंदी आल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे मुंबईतील एका बिल्डरला आपले घर विकण्याची वेळ आली आहे.

इमारत
इमारत

By

Published : Aug 20, 2020, 10:18 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यात बांधकाम व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायात मोठी गुंवतणूक केली. तर अनेकांकडून कर्ज घेतले. टाळेबंदीमुळे पैशाचा तगादा मागे लागल्याने 30 कोटी बाजारमूल्य तर 20 कोटी रेडिरेकनर दर असलेले घर एका बिल्डरने 16 कोटी विकल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बांधकाम क्षेत्रात मंदी आणि त्यात कोरोना-लॉकडाऊन या दोन्हीचा फटका बिल्डरांना बसण्यास आता सुरूवात झाल्याची चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मुंबईतील एक बिल्डर काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यात कोरोना व लॉकडाऊनने त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली. शेवटी त्यांनी ग्रॅंट रोड येथील आपला घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 5 ऑगस्टला त्यांनी हक्काचे घर विकले. आतापर्यंत शेकडो घर विकत ग्राहकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या करणाऱ्या बिल्डरने आर्थिक चणचण लागल्याने स्वतःचे हक्काचे घर विकावे हे अपवादात्मकच. आझाद मैदानाजवळ प्राईम परिसरात 'ले प्लाझो' टॉवरमधील 33 व्या मजल्यावर त्या बिल्डरचे 2 हजार 316 चौ फुटाचे प्रशस्त घर होते. या घराची बाजारातील किंमत 29 ते 30 कोटी दरम्यान आहे. तर रेडीरेकनर दर 20 कोटी आहे. असे असताना हे घर 16 कोटी मध्ये म्हणजेच चक्क रेडीरेकनरपेक्षा 4 कोटी पेक्षा कमी दरात विकले आहे.

आर्थिक अडचणीत बँकेकडून कर्ज घेत त्याचे भरमसाठ व्याज भरण्यापेक्षा घर विकणे योग्य असल्याचे म्हणत या बिल्डरने कमी दरात हक्काचे घर विकले आहे. या एका घटनेमुळे लॉकडाऊनमधील बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि बिल्डरांची वाताहत समोर आली आहे. दरम्यान, त्या बिल्डरशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

हेही वाचा -स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात महाराष्ट्राची हॅट्रिक, ४ राष्ट्रीय पुरस्कारांसह मिळवले १३ अन्य पुरस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details