मुंबई- मुकेश नविनचंद सावला (56) याव्यक्तीने माटुंगा परिसरातील लक्ष्मी निकेतन या इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली .
इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन बिल्डरची आत्महत्या
माटुंगा पोलिसांनी सावला यांच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू अशी केली आहे. सावला यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
मुकेश सावला
बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या मुकेश सावला यांनी आत्महत्या केल्याने माटुंगा परिसरात खळबळ माजली आहे. सावला हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते.
मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. माटुंगा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.