मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला कुरार पोलीसांनी पालघरमध्ये इमारतीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केले असून चाचपडणीत त्याच्या कडून एक देशी पिस्तुल व सात जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याअंतर्गत कुरार पोलीसांनी रजिबूर रहमान मखलीकूर रहमान बेग (वय - 34) यांना अटक केले आहे.
देशी पिस्तुलासह बिल्डरला अटक, सात जिवंत काडतूस हस्तगत - पालघरमध्ये पिस्तूलासह एका व्यक्तीला अटक
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशी पिस्तुलासह बिल्डरला अटक केली. या वेळी त्याच्या कडून सात जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली.
देशी पिस्तुलासह बिल्डरला अटक, सात जिवंत काडतूस हस्तगत
पोलिसांनी सांगितले की आरोपी रजिबूर मालाड पूर्व येथील पठाणवाडी येथे राहत असून त्याचा पालघर येथे बांधकामचा व्यवसाय आहे. कुरार पोलीस उप निरीक्षक सतर्डेकर यांना सूचना मिळताच 25 जानेवारीला गोल्ड जिम परिसरात त्यांना आरोपी दिसला, साध्या गणवेशतील पोलिसांनी आरोपीस पकडले. पोलिसांनी झडती दरम्यान पिस्तुल व सात जिवंत काडतूस हस्तगत केली.