मुंबई: बँकिंग, रिअल इस्टेट, उद्योग, सोने व्यापार यांच्यासहित सामान्य नागरिक देखील या बजेटकडे आशेने पाहत आहे. सादर होणाऱ्या या बजेटमधून आपापल्या क्षेत्राला दिलासा मिळावा अशी आशा सर्वांनाच आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसापूर्वीच परवडणाऱ्या घरांवरचा जीएसटी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थमंत्र्यांचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे चेअरमन राजेंद्र सावंत यांनी मत व्यक्त केले आहे.
रेल्वेत सुधार गरजेचे : भारतीय रेल्वेला बजेटमध्ये विक्रमी तरतूद मिळण्याची शक्यता आहे. 500 पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेसची निर्मीती, 100 टक्के विद्युतीकरण आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यासह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यात राज्यातील रेल्वेला कितीची देणगी मिळेल हे पाहण गरजेच आहे. सध्या राज्यातूल रेल्वेत अनेक सुधार गरजेचे आहेत. प्लॅटफॉर्म दुरूस्ती, रेल्वे सिग्नल, रेल्वे कनेक्टिव्हीटी या सर्वांचा यात समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रेल्वेला 2022-2023 मधील 1.4 लाख कोटी रुपयांवरून 2023-24 आर्थिक वर्षासाठी 1.9 लाख कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय आणखी 1.2 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्याची शक्यता आहे.
किल्ल्यांचे सर्वधण :छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करून देण्यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धम गरजेचे आहे. राज्यातील गड व किल्ल्यांचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवछत्रपतींच्या कालखंडातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तो तत्त्वता स्वीकारण्यात आला आहे. वसई, जंजिरा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, यशवंतगड, बाणकोट, पुर्णगड, अर्नाळा, कुलाबा यासह अकरा समुद्र किल्ल्यांचा समावेश करण्यात येणार आहे. किल्ले संवर्धन समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये सदस्यांकडून विविध सूचनादेखील केलेल्या आहेत. पर्यटनाच्या दुष्टीने अर्थसंकल्पात निधी मिळणे गरजेचे आहे. यातून रोजगार देखील उपलब्ध होतील.
रस्त्ये सुविधा : जगात भारतात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झाला होता. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 14 हजार 200 जण जखमी झाले आहेत. 2021 च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यात सहा हजार 837 जणांचा मृत्यू झाला होता. तर 14 हजार 420 अपघात झाले होते. या अपघातात 11 हजार जण जखमी झाले. 2020 च्या महिल्या सहा महिन्यात 5 हजार 209 जणांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत 11 हजार 481 अपघात झाले होते तर 9 हजार 641 जण जखमी झाले होते. 2020 आणि 2021 च्या तुलनेत 2022 जानेवारी ते जून यादरम्यान जास्त मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक आकडेवारी आहे.