मुंबई - जागतिक धम्म परिषदेचे औरंगाबाद येथे 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया या देशातील धम्मगुरू आणि भिक्खू गण या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती बोधिसत्व पार्लो महाथेरो यांनी मुंबई येथे दिली. या परिषदेमध्ये जगातील आर्थिक मंदी आणि शांतता यावर चर्चा होणार आहे.
जागतिक धम्म परिषद औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह श्रीलंका येथील भन्ते गुणरत्न महानायक डॉ. वाराकागोडा महाथेरो यांच्यासह देशातून अनेक मान्यवर बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश हाच जगाला दुःख मुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो, तर दुसरीकडे जगभरात निर्माण झालेली आर्थिक मंदी यावर बुद्धाच्या विचारातून मार्ग निघू शकतो, यावर या धम्म परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत १३ देशातील प्रतिनिधी चर्चासत्रातून संवाद साधणार असल्याची माहिती बोधिसत्व पार्लो महाथेरो यांनी दिली.
हेही वाचा - राज्यभरात उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे..