मुंबई:शनिवारी दादरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक होती. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, तलवार आणि चॉपर घेऊन हा हल्ला केला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.
हल्ल्याचा निषेध:वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. कार्यकर्त्यांवर हल्ला म्हणजे आंबेडकर भवनावर हल्ला झाला असल्याचे आम्ही मानतो. या हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असे त्या म्हणाल्या. या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईत सध्या पक्षाच्या बऱ्याच सभा होताना दिसत आहेत. पुढची सभा ही ३ जून रोजी होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते.
पोलिसांची घटनास्थळाला भेट:मुंबई पोलीस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती प्राप्त झाली.
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यावर हल्ला: मनसेच्या विधानसभा उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ युवक अध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. कल्पना हॉटेलच्या बाहेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सचिन अहिरेकरवर अचानक मनसेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला.
डोक्यावर दगडाने हल्ला: अंबरनाथ येथील कल्पना हॉटेलच्या बाहेर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सचिन अहिरेकरवर अचानक मनसेचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले सुमेध भवार आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला. अहिरेकर यांना दगडाने मारहाण झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात अहिरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज ठाकरेंविषयी अपशब्द: सचिन अहिरेकरने आपल्याला फोन करून शिवीगाळ केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर तो दारू पिऊन भेटण्यासाठी आला होता. त्याने दारूच्या नशेत माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या अंगरक्षकांनी बचावाचा प्रयत्न केला असे मनसेच्या सुमेध भवार याने सांगितले.
हेही वाचा:
- Mumbai Kandivali Firing : कांदिवलीतील लालजी पाडा परिसर पुन्हा हादरला, गोळीबारात मनोजसिंह चौहान ठार
- Terrorists Killed in Manipur : मणिपूर हिंसाचारानंतर आतापर्यंत 30 दहशतवादी ठार, आसाम रायफल्सची कारवाई
- Spanish Woman Molesting Case: स्पॅनिश पर्यटक महिलेचा विनयभंग करणाऱ्या मॅनेजरला दोन वर्षांचा कारावास